📰 ताज्या बातम्या

समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक मांटे यांचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

च
Shamsundar chittoda
24 फेब्रुवारी 2026•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

कठीण परिस्थितीतून यश मिळवत यशाला गवसणी घालून महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोगाच्या मार्फत 4 थ्या क्रमांकाने तब्बल दोन वेळा वर्ग 1 पदी निवड झाली त्यामध्ये समाज कल्याण विभागामध्ये सहाय्यक आयुक्त तसेच इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामध्ये सहाय्यक संचालक या पदांवर निवड झालेल्या

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगावचे सुपुत्र दिपक सु.मांटे यांचा दिनांक 23 फेब्रुवारी रोजी लोकसेवा नशामुक्ती व्यसन केंद्रामध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला ' यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला गावच्या सर्वांगीण विकासासाठी समाज कल्याण विभागामध्ये विविध प्रकारच्या योजनांची चर्चा केली.

तसेच एक आदर्श गाव बनवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या गावामध्ये लोकसहभागातून तसेच शासनाच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून दरेगाव या गावांमध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवले. आज रोजी तालुक्यामध्ये एक आदर्श गाव म्हणून दरेगावचा नावलौकिक झालेला आहे. गावातील लोक जातीपातीचे राजकारण सोडून जेव्हा विकासासाठी एकत्र येते तेव्हा काय होऊ शकतं याचं दरेगाव येथील नागरिकांनी एक उदाहरण दिलेला आहे.

यावेळी त्यांनी लोकसेवा व्यसनमुक्ती केंद्र तर्फे राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती घेतली आतापर्यंत लोकसेवा व्यसनमुक्ती केंद्र मधून १००० पेक्षा जास्त तरुणांनी दारूचे व्यसन सोडले आहे '

त्यामुळे राधेश्याम बंगाळे पाटील त्यांचेही त्यांनी कौतुक केले

यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष प्रताप दादा मोरे यांच्या हस्ते समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नागपूर दीपक माटें यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समाधान सरकटे ,तालुका अध्यक्ष गणेश पंजरकर, पत्रकार अहमद कुरेशी, जुबेर शहा, गणेश काळे, पिंपळगावचे माजी उपसरपंच बंडू ठाकुर. नशामुक्ती व्यसन केंद्राचे संचालक राधेश्याम बंगाळे यावेळी उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 फेब्रुवारी 2026
महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निवडपत्राचे मान्यवरांच्या हस्ते थाटात वितरण!

महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निवडपत्राचे मान्यवरांच्या हस्ते थाटात वितरण!

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात