📰 ताज्या बातम्या

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

च
Shamsundar chittoda
7 सप्टेंबर 2026•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.

शिवसेना जिल्हाप्रमुख मा. महेश नळगे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नितीन जेथलिया परतुर नपचे गटनेते गणेश नळगे, बाबुराव हिवाळे होते.

यावेळी दहीहंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा उत्साह आणि उपस्थित नागरिकांच्या जल्लोषामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते प्रथम पारितोषिक तब्बल ५० हजार ९९९ रुपये. दमदार कामगिरी करणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकाला हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास नगरसेवक राजेश खंडेलवाल, शाकेर खतिब, विसम सय्यद, दिपक कदम दिपक काळे, दत्ता पाटील सुरूंग ,राहुल कदम , मधुकर पाईकराव, विजय वाणी, अशोक तनपुरे शाम बरकुले संदिप जगताप बबलुशेठ बंदुकवाले , नामदेव धुमाळ ,भाऊसाहेब मुके ,शुभम पडुळ प्रताप देशमुख, शाम शिंदे, गजानन मस्के, संदिप पाचारे रवि देशमुख , ज्ञानेश्वर केवारे, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच परतूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवर व नागरिकांचे स्वागत करण्यात आले.

शिवसेनेच्या वतीने आयोजित या दहीहंडी महोत्सवामुळे परतूर शहरात उत्साह, एकजूट आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→6 सप्टेंबर 2026
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणारताज्या बातम्या
6 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात